परभणी: आषाढी वारी करून अकोल्याला परतणाऱ्या वारकर्‍याचा बसमध्ये मृत्यू | पुढारी

परभणी: आषाढी वारी करून अकोल्याला परतणाऱ्या वारकर्‍याचा बसमध्ये मृत्यू

परभणी, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरची आषाढी एकादशीची वारी करून अकोल्याला परत जाणार्‍या वारकर्‍याचा पंढरपूर ते अकोला या बसमध्ये मृत्यू झाला. हा प्रकार गंगाखेड येथे एका प्रवाशाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. नरेंद्र आनंदराव काळणे (वय 75, रा.जोगळेकर प्लॉट, अकोला) असे या मृत वारकर्‍याचे नाव आहे.

गंगाखेड येथील धैर्य मंगल कार्यालयात एका सामाजिक समुहाने वारकर्‍यांसाठी मोफत चहापाण्याची सुविधा केली होती. गुरूवारी (दि.29) रात्री पंढरपुरहून अकोला जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा आगाराची बस (एमएच 40 सीएम 3520) ही याठिकाणी दाखल झाली होती. बसमधील काही वारकरी चहापानासाठी खाली उतरले. चहापान घेवून ते बसमध्ये बसल्यानंतर शेजारी बसलेली एक व्यक्‍ती निपचीत पडल्याचे एका वारकर्‍याच्या लक्षात आले.

त्यांनी तातडीने ही बाब सेवा आयोजकांपैकी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख विष्णु मुरकूटे, प्रा. डॉ. मुंजाजी चोरघडे, गोटू आंधळे, सिध्देश्‍वर आंधळे, ऋषिकेश सोळंके यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ती बस गंगाखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आली. तेथे डॉ. देशमुख यांनी ईसीजी काढल्यानंतर तो वारकरी मृत असल्याचे जाहीर केले. बसचालक सलीम पठाण व वाहक अशोक रामचंद्र आडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. तत्पुर्वी विष्णु मुरकूटे यांनी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button