अकोला: चिखलपुरा हत्याकांडातील तिसरा आरोपी गजाआड | पुढारी

अकोला: चिखलपुरा हत्याकांडातील तिसरा आरोपी गजाआड

अकोला: पुढारी वृत्तसेवा: चिखलपुरा परिसरात आकाश वाकोड़े व गौरव मानकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्रांनी १२ मेरोजी हल्ला करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आज (दि. ३१) आणखी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने शिताफीने याआधी दोन आरोपींना अटक केली होती. आता तिसरा आरोपी सुद्धा गजाआड केला आहे. सुमेध नवीन सरकटे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई कासम नौरंगाबादे, भूषण मोरे, गनेश निलखन यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button