भंडारा : वीज काेसळून दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू  | पुढारी

भंडारा : वीज काेसळून दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू 

भंडारा; पुढारी वृत्तसेवा :  शेतात काम करीत असलेल्या दोघा शेतकऱ्यांचा वीज कोसळून  मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तालुक्यातील वाघबोडी येथे ही घटना आज (दि.२६) दुपारी घडली. यादवराव अर्जुन शहारे (६५, रा. विद्यानगर, भंडारा) आणि रमेश श्रावण अंबादे (५२) अशी मृतांची नावे आहेत.

जिल्ह्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. वाघबोडी येथे तेजराम बडोले यांच्या शेतात शेतीची कामे सुरू आहेत. या कामावर यादवराव शहारे व रमेश अंबादे होते. दरम्यान, दुपारी पावसासह अचानक वीज कोसळल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा 

Back to top button