Ashish Deshmukh: काँग्रेस ओबीसीद्रोही, म्हातारा पक्ष : डॉ. आशिष देशमुखांचे टीकास्त्र

Ashish Deshmukh: काँग्रेस ओबीसीद्रोही, म्हातारा पक्ष : डॉ. आशिष देशमुखांचे टीकास्त्र
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले नेते डॉ. आशिष देशमुख यांनी आज (दि.१८) अखेर कोराडी येथे एका कार्यक्रमात भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला. यावेळी आपण पक्ष मजबुतीसाठी आलो आहोत. 2024 मध्ये कुठलीही निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून काँग्रेस हा ओबीसीद्रोही आणि म्हातारा पक्ष असल्याचे टीकास्त्र सोडले. डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. झालेल्या चुका विसरून माझी घरवापसी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस व गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याचा निशाणा साधला. देशमुख म्हणाले, कर्नाटक निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी ओबीसींबद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल माफी मागावी, अशी माझी मागणी होती. मात्र, राहुल गांधींनी माफी मागितली नाही. याच राहुल गांधींनी राफेल घोटाळ्यासंदर्भात जे काही बेताल वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांना कोर्टाने खडसावले होते. त्यानंतर राहुल गांधींनी माफी देखील मागितली होती. चौकीदार चोर है, या वक्तव्याबद्दलही राहुल गांधींनी माफी मागितली. मात्र, ओबीसींबद्दल अवमानजनक वक्तव्य करूनही राहुल गांधींनी माफी मागितली नाही. मात्र, मी ही मागणी करताच माझे निलंबन करण्यात आले.

Ashish Deshmukh : कोणतीच निवडणूक लढवणार नाही

मी भाजपमध्ये कुठल्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही. मी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविणार नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. भाजप जो उमेदवार उभा करेल, त्याला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. काँग्रेस आता म्हातारा पक्ष झाला आहे. पूर्वी माझा काँग्रेसकडे कल असला तरी यापुढे मी भाजपसोबतच राहणार आहे, अशी ग्वाही देतो. मी विदर्भात भाजपचे २०-२५ आमदार निवडून आणू शकतो, असेही ते म्हणाले. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news