नागपूर : हवामान अंदाज चुकला, मान्सून लांबला,विदर्भात उष्णतेची लाट

नागपूर : हवामान अंदाज चुकला, मान्सून लांबला,विदर्भात उष्णतेची लाट
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बिपरजॉय वादळामुळे हवामान विभागाचा अंदाज चांगलाच चुकला असून विदर्भात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. उन्हाचा तडाखा असह्य होत आहे.आगामी दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट असून हवामान विभागामार्फत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी जास्त आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारणपणे विदर्भात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पाऊस होतो आणि उष्णतामान कमी होत असते. पण यंदा अद्याप पाऊस न झाल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे.  नागरिकांनी घराबाहेर पडताना उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सून लांबणीवर?

बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून तो लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सून लांबल्याने खरीप पेरणीचे नियोजन बिघडण्याची भीती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news