नागपूर : चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत निर्दोष तरुणाचा मृत्यू | पुढारी

नागपूर : चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत निर्दोष तरुणाचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :- चोर समजून एका निर्दोष तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा कामठी पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर  मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१७) सायंकाळी घडली. नासिर उर्फ गब्बर मो. रमजान अन्सारी (वय 40) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नासिर उर्फ गब्बर मो. रमजान अन्सारी (वय 40 ) हा तरुण आज सायंकाळी फुटाना ओली चौकातील एका  दुचाकीजवळ उभा राहून दुचाकीची छेड करत असताना तेथे उपस्थित नागरिकानी तो गाडी चोरी करीत असल्याचे समजून  सदर तरुणास नागरिकांच्या जमावाने सामूहिक मारझोड केली. यानंतर त्याला जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. मात्र, काही वेळातच सदर तरुणाचा पोलीस स्टेशनमध्येच मृत्यू झाला.
या घटनेने वारीसपुरा तसेच फुटाना ओली परिसरात एकच खळबळ माजली आहे.  सदर निर्दोष तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.  पोलिसांनी  उत्तरीय तपासणीसाठी सदर मृतदेह त्वरित शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घटनेचे वास्तव शोधण्यात येत आहे. पुढील तपास जुनी कामठी पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button