धमकी देणारा कुणीही असो, कारवाई व्हावीच : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

धमकी देणारा कुणीही असो, कारवाई व्हावीच : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा प्रकार योग्य नाही, धमकी देणे आमच्या रक्तात नाही, धमकी देणारा कुणीही असो कारवाई व्हायलाच हवी असे स्पष्ट मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, शुक्रवारी (दि.९) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. विरोधकांनी हा धमकी देणारा अमरावती येथील भाजयुमो कार्यकर्ता असल्याचा आरोप केला असून बावनकुळे यांच्यासह भाजप नेत्यांसोबत त्याचे फोटोही यानंतर आज व्हायरल झाले आहेत, हे विशेष. दरम्यान, रद पवार यांना आवश्यक सुरक्षा पुरविण्याची आमच्या सरकारची, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी असल्याचे बावनकुळे म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ओबीसीचा पहिल्या नंबरचा शत्रु असल्याचा आरोप करीत बावनकुळे म्हणाले, विदर्भात येऊन राष्ट्रवादीने दोन दिवसीय शिबीर घेतले. मात्र नागपूर अधिवेशन हे केवळ दिखावा होता. ओबीसी समाजाला अध्यक्षपद देण्याची हिंमत त्यांनी दाखविली नाही. ओबीसी जनता राष्ट्रवादीला कधीही समर्थन करणार नाही. राष्ट्रवादीने ओबीसीचा सतत घात केला आहे. भविष्यात भाजप – सेना युतीचेच सरकार राज्यात सत्तेत येणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी आज पत्रपरिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काही कल्पना नाही. २८८ विधानसभेचे निवडणूक प्रमुख भाजपने जाहीर केले आहेत. या सोबतच ४८ लोकसभेचे निवडणुक प्रमुख जाहीर केले आहेत. ज्याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना भाजप पेक्षाही अधिक पाठिंबा देणार आहोत. राज्यात आम्ही भाजप- सेना मिळुन ४५ प्लस लोकसभा आणि २००प्लस विधानसभा जागा आम्ही जिंकू असे नियोजन आहे. महाविकास आघाडीला बरखास्त करुन भाजप आणि शिवसेना युती निवडून येईल.

दरम्यान, मुख्यमंत्री यांचे जम्मू-काश्मिर दौरा संदर्भात बावनकुळे म्हणाले,एखादा व्यक्ती दिवसरात्र १८-२० तास काम करतो आणि जर तो तीन दिवस आपल्या कुटुंबासोबत कुठे गेले तर गैर काय आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढलाच पाहिजे यावर भर दिला.खा संजय राऊत यांना योग्य उत्तर नितेश राणे हेच देतील असे सांगत बोलणे टाळले.

अधिक वाचा :

Back to top button