नागपूर : गांधीगेट परिसराने अनुभवला अनोखा शिवराज्याभिषेक सोहळा | पुढारी

नागपूर : गांधीगेट परिसराने अनुभवला अनोखा शिवराज्याभिषेक सोहळा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने दुर्गराज रायगडापासून राज्यभरात विशेष उत्साह शिवप्रेमींमध्ये पहायला मिळाला. नागपुरात गांधीगेट महाल परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज जणू शिवसृष्टीच अवतरली होती. ३० ढोलताशांच्या पथकांनी यावेळी महाराजांना अभिवादन केले.

राष्टीय स्वयंसेवक संघातर्फे विशेष पथसंचलन, जयघोष वादन सादर केले. आज दिवसभर या पुतळ्याजवळ शिवप्रेमींच्या आनंदोत्सवाला उधाण आले होते. या सोहळ्यामध्ये रा.स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राजे मुधोजी भोसले यांच्यासह शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना सकाळी दुग्थ अभिषेक करून पालखी सुद्धा काढण्यात आली. ३५१ भगवे ध्वज सलामी देत असताना हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली. शिवाजी महाराज कृती समितीतर्फे शिवाजी नगरात हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जगतगुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी, राजे मुधोजी भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button