नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर यात्रेकरुंच्या ट्रॅव्हल्सला अपघात; १० जखमी | पुढारी

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर यात्रेकरुंच्या ट्रॅव्हल्सला अपघात; १० जखमी

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मरारवाडी जवळ भरधाव वेगाने जाणारी ट्रॅव्हल्स उलटले. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स चालकाला पहाटे डुलकी आल्याने ही ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उलटल्याचे कळते. ही घटना आज गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात मात्र कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

जबलपूरकडून नागपूरकडे देवदर्शन घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक PY.01.CU.5791 च्या चालकाला मरारवाडी परिसरात डुलकी आल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 35 ते 40 यात्रेकरू होते. अपघाताची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा यांना कळताच अँब्युलन्स टीम घटनास्थळी धाव घेतली व जखमी व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे नेण्यात आले. यातील 5 जणांना नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले असून 5 जणांवर मनसर येथे उपचार सुरू आहेत. बाकी यात्रेकरू यांना टोल प्लाझा खुमारी येथे ठेवण्यात आले आहे.

-हेही वाचा 

जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, लाखो रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लूटले

नागपूर : केवळ नाव नको महापुरुषांच्या विचाराने वागा; नाना पटोले यांचा सरकारला सबुरीचा सल्ला

बीड : केज-मांजरसुंबा मार्गावर अपघात, जि. प. शाळेचे शिक्षक जागीच ठार

Back to top button