बीड : केज-मांजरसुंबा मार्गावर अपघात, जि. प. शाळेचे शिक्षक जागीच ठार

केज (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा – केज-मांजरसुंबा मार्गावर सारणी (सांगवी, तालुका केज पाटीजवळ) टिप्परने मोटारसायकलला धडक दिली. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक भागवत महादेव तांदळे (वय ४५, रा. अंबिलवडगाव, ता. जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी महानंदा तांदळे यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात दि १ जून रोजी सकाळी ११:३० वाजता झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, शमीम पाशा आणि संभुदेव दराडे हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे. जखमी महिलेला उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.
- पुणे: नदीकाठ प्रकल्पासाठी 31 जुलैपर्यंत झाडे तोडण्यास स्थगिती, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश
- चिंताजनक! पुण्यात मुलींचे प्रमाण पुन्हा घटले; शहरात नवजात मुलींचे प्रमाण राज्य, देशापेक्षा कमी
- Rs 2000 note exchange | RBI च्या २ हजारांच्या नोटाबाबतच्या निर्णयाला आव्हान, याचिकेवर तत्काळ सुनावणीस SC चा नकार