

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अंजनगाव सुर्जी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक (दि.१७ मे) रोजी दुपारी पार पडली. या निवडणुकीत सभापती करिता सहकार पॅनलचे जयंत साबळे यांची तर सुरेश पाटील राऊत यांची उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली. अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनंतराव साबळे यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता आली होती.
बाजार समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत अनंतराव साबळे यांचे कनिष्ठ बंधू ॲड. जयंत गुणवंतराव साबळे यांची तर उपसभापतीपदी सहकार पॅनलचे जेष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश पाटील राऊत यांची निवड झाली. यावेळी कृ उबासचे नवनियुक्त संचालक अमर शिंगणे, संजय काळमेघ, अविनाश सदार, विजय कळमकर, विकास येवले, सुरेश आडे, विशाल पंडीत, अनंता रोकडे , प्रदीप इंगळे, पुनम पोटे, सागर घोगरे, शारदा ढोक, बबलू शेळके, शंकरराव चोरे, शेख जमिल शेख रहमान, रवि उपाध्ये या निवडप्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच सहकार पॅनलचे नेते अनंतराव साबळे, पंजाबराव सावरकर, हरिभाऊ बहिरे, शशिकांत मंगळे, बाळासाहेब पोटे, अशोकराव चरपे, बाळासाहेब चऱ्हाटे, खविसंचे अध्यक्ष गजानन धोटे, किसान जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष सुबोध काळमेघ, शरद कडू, भुजंगराव कोकाटे, अमोल घुरडे, तसेच बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यात कित्येक वर्षापासून सहकाराच्या राजकारणात सहकार महर्षी स्व.प्रा. गुणवंतराव साबळे यांच्या काळापासून सहकार पॅनलची एक हाती सत्ता असते. सहकार पॅनलचे नेतृत्व पूर्वी स्व. गुणवंतराव साबळे तर आता त्यांचे सुपुत्र अनंतराव साबळे करत आहे. अजून पर्यंत कुठलेही पद स्वतःकडे ठेवले नव्हते. परंतु पहिल्यांदाच अंजनगावच्या सहकाराच्या राजकारणात बाजार समिती चे नेतृत्व अनंतराव साबळे यांनी आपले कनिष्ठ बंधू ॲड जयंतराव साबळे यांच्या दिल्याने तालुक्यात विशेष चर्चा आहे.