अमरावती : नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर ढेपे गटाचा सभापती

अमरावती : नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर ढेपे गटाचा सभापती
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :  नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी ढेपे गटाचे प्रभात पाटील ढेपे व उपसभापती पदी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विलास पाटील सावदे यांची निवडणुकीद्वारे निवडणूक झाली. ५ विरुद्ध १३ ने निवडणूक पार पडली. यावेळी प्रभात ढेपे यांना १३ मते तर विरोधात काँग्रेसचे दिपक सवाई यांना ५ मते मिळाली तर उपसभापती पदा करिता विलास सावदे यांना सुद्धा १३ मते शिवसेनेचे विजय अजबले यांना ५ मते मिळाली.

यावेळी सहकार नेते अभिजित ढेपे शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब भागवत, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राणे, तालुका प्रमुख प्रमोद कोहळे, प्रकाश मारोटकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. अडीच वर्षा करिता सभापती, उपसभापती ठरवण्यात आले आहे. यावेळी ओंकार ठाकरे, प्रवीण चौधरी, ज्ञानेश्वर रिठे, संजय देवतळे, रत्नाकर खेडकर, गजानन खोडे, श्याम राऊत, बाळासाहेब रोहणेकर, भाजपचे राजेश पाठक, घनश्याम सारडा, बाजार समितीचे नवनियुक्त संचालक डॉ. राजेंद्र पांडे, प्रमोद ठाकरे, नानाभाऊ हांडे, पंकज ठाकरे, अंकुश कोल्हे, विवेक वैष्णव, मोनू जागडा, अर्चना कणसे, सोनाली लेंडे, धनु मेटकर, गजानन ढेरे ह्या संचालकांनी मतदान केले. यावेळी विजयी झालेले सभापती प्रभात ढेपे व उपसभापती विलास सावदे यांचे अभिजित ढेपे व बाळासाहेब भागवत यांनी स्वागत केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news