डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची सीबीआय चौकशी करा: आमदार विकास ठाकरे | पुढारी

डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची सीबीआय चौकशी करा: आमदार विकास ठाकरे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर कॅगने गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवणारा अहवाल राज्य सरकारला दिला होता. नागपूर महामेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

ब्रिजेश दीक्षित यांनी आपला कार्यकाळ संपल्याने कार्यभार नुकताच अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) डॉ. नितीन करीर यांच्याकडे सोपविला हे विशेष. यासाठी आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र सुद्धा पाठविले आहे. येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा विकास ठाकरे हे विधानसभेत मांडणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button