नागपूर : मेडिकलमध्ये रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण | पुढारी

नागपूर : मेडिकलमध्ये रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मेडिकल रुग्णालयात सोमवारी (दि. १५) एका तरुणच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित विभागात असलेल्या तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केली. निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर मेडिकलमधील डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लागलीच मर्डने आंदोलनाचा इशारा दिला. मात्र अधिष्ठात्याशी केलेल्या चर्चेनंतर हे प्रकरण शांत झाले. शताब्दी चौक परिसरात राहणारे कल्पेश यादव (३७) असे मृताचे नाव आहे. पोटाचा गंभीर आजार असल्याने डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्याची प्रकृती खालावल्याने आयसीयूत दाखल करण्यास सांगितले मात्र दरम्यान मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी निवासी डॉक्टर सुषमा महाले ,डॉक्टर प्राची अग्रवाल, डॉक्टर राहुल अग्रवाल आणि एक पॅरामेडिकल विद्यार्थी या सर्वांना मारहाण केली त्यामुळे रेडिओलॉजी विभागात तणावाचे वातावरण होते. सुरक्षारक्षकांनी तीन कुटुंबीयांना पकडले तर एक जण फरार झाला. घटनेनंतर मेडिकलचे वातावरण तापले अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये यांनी सुरक्षारक्षकांची बैठक बोलावून खडे बोल सुनावले.

Back to top button