नागपूर: पुण्याला जाणाऱ्या विमानाला पक्ष्याची धडक; उड्डान रद्द | पुढारी

नागपूर: पुण्याला जाणाऱ्या विमानाला पक्ष्याची धडक; उड्डान रद्द

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूरवरून पुण्याला निघालेल्या इंडिगोच्या एका विमानाला आज (दि. १५) टेकऑफ करत असताना एक पक्षी धडकल्याने मोठा अनर्थ टळला. तातडीने इंडिगोचे 63135 विमानाचे उड्डान रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, तीन ते चार तासानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने किंवा याच विमान दुरुस्तीचे काम झाल्यानंतर रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ सूत्राने दिली. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हरीण, जंगली डुक्कर, कुत्रे यांचा धावपट्टी परिसरात मुक्त संचार यापूर्वी देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे अनेकदा हवाई उड्डाणे प्रभावित झालेली आहेत, हे विशेष.

हेही वाचा 

Back to top button