नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात

नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकारतर्फे व आरोपी तर्फे अंतिम युक्तिवाद झाला. या प्रकरणात फिर्यादी रवीकांत कांबळे यांची आई व दीड वर्षाच्या मुलीची 17 फरवरी 2018 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

तपासात एकूण चार आरोपीविरोधात एसीपी बनसोड यांनी दोषारोपपत्र दाखल केले . या प्रकरणात सरकारतर्फे एकूण 35 साक्षीदार पडताळण्यात आले. युक्तीवादात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चार चाकी महेंद्र एक्सयूव्ही 500 गाडीतून उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांचे रक्ताचे डाग मिळून आले. फॉरेन्सिक चाचणीत उषाबाई कांबळे यांचा डीएनए जुळून आल्याचे निष्पन्न झाले याकडे लक्ष वेधले. याशिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी आरोपी गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू यांना घटनेच्या दिवशी दुकानात पाहिले तसेच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना दोन पोते आरोपीच्या घरच्या जिन्यावरून खाली उतरवून गाडीत टाकताना आणि त्यानंतर ते पोते विहिरगाव नाल्यात फेकताना साक्षीदारांनी बघितले आहे.

आरोपींनी सूडबुद्धीने, गुन्हेगारी कट रचून, संगनमताने दीड वर्षाच्या मुलीचा व तिच्या आजीचा गळा कापून खून करून त्यांचे प्रेत पोत्यात टाकून गाडीने नेऊन नाल्यात फेकले व पुरावा नष्ट केला. दरम्यान, आरोपी अंकित शाहू, गुडिया शाहू व विधी संघर्ष बालकतर्फे आरोपींचे वकील आर.एम. भागवत यांनी संगितले की सरकार पक्षाने न्यायालयात आरोपीच्या विरोधात जी बाजू मांडली ती पूर्णपणे खोटी आहे. हा खुन आरोपींनी केलाच नाही असा युक्तिवाद केला. आरोपी गणेश शाहु तर्फे ॲडवोकेट चांदेकर यांनी सरकारतर्फे आरोपींच्या विरोधात जे पुरावे सादर केले ते सर्व खोटे आहेत. हा युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. गावंडे यांच्या कोर्टात झाला लवकरच कांबळेदुहेरी हत्याकांडाचा निर्णय येणार आहे, या खटल्याच्या निर्णयावर जनतेचे लक्ष लागलेले आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news