मोबाईल देत नाही म्हणून बायकोने नवऱ्याचे विळ्याने ओठ कापले | पुढारी

मोबाईल देत नाही म्हणून बायकोने नवऱ्याचे विळ्याने ओठ कापले

भंडारा; पुढारी वृत्तसेवा

आधुनिक युगात मोबाईलला अनन्यसाधारण महत्व आले आहे. लहान मुलांपासून थोरामोठ्यांना मोबाईल वेड लावले आहे. मोबाईलमुळे तरुणाईना भुरड पडल्याने अनेकांचे जीवन उध्वस्त झाले तर अनेक कुटुंबात कलह निर्माण करण्याचे काम सुद्धा मोबाईलने केले.

मोबाईल काहीसाठी तारक तर अनेकांसाठी मारक ठरले आहे. अनेक घटना समाजात घडल्या. मात्र एका पत्नीला नवऱ्यापेक्षा मोबाईलचा अधिकच वेड लागल्याने तिने चक्क पतीकडून मोबाईल न मिळाल्याने मोबाईलवेड्या पत्नीने आपल्याच नवऱ्यावर विळ्याने हल्ला करून त्याचे ओठच कापून घेतल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली आहे.

मासळ येथील खेमराज बाबुराव मूल (वय ४०) यांचा मोबाईल मागील ३ दिवसांअगोदर बिघडला. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल काही दिवस वापरासाठी मागितला. त्यानंतर दोन दिवस होऊनही मोबाईल पत्नीला दिला नाही. त्यामुळे १४ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यात रागाच्या भरात पत्नीने प्रेमीना खेमराज मूल हिने घराच्या खोलीत असलेला लोखंडी विळा आणून पती खेमराजच्या ओठावर वार केला. त्यामुळे खेमराजचे ओठ कापले असून जबर दुखापत झाली.

लगेच लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरच्या अहवालावरून व तक्रारदार खेमराज मूलच्या तोंडी तक्रारीवरून लाखांदुर पोलिसात पत्नी प्रेमीना खेमराज मूल हिच्यावर कलम ३२४,५०४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलीप भोयर करीत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button