Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिनने केला शब्द पूर्ण; म्हणाला होता, 'मी पुन्हा भेट वस्तू घेऊन येईन' | पुढारी

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिनने केला शब्द पूर्ण; म्हणाला होता, 'मी पुन्हा भेट वस्तू घेऊन येईन'

चंद्रपूर,पुढारी वृत्तसेवा: सचिन तेंडूलकर चार दिवसांच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीकरीता पत्नीसह आला. शुक्रवारी (दि.६) ताडोबाच्या बफर झोनमधील अलिझंझा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू घेऊन पोहचला. टीव्हीवर बघितलेला सचिन जेव्हा शाळेत भेटवस्तू घेऊन येताच विद्यार्थ्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला. फेब्रुवारी महिन्यात अलिझंझा गेटद्वारे सफारी करताना शाळेला अचानक भेट दिली होती. ‘आणि मी पुन्हा तुमच्यासाठी भेटवस्तू घेऊन येईन’ असा शब्द दिला होता. तो शब्द आज ताडोबाच्या भेटीत पूर्ण केला. (Sachin Tendulkar)

२ महिन्यापूर्वी  विद्यार्थ्यांना दिला होता शब्द

ताडोबाच्या बफरझोनमध्ये अलिझंझा हे छोटेसे गाव आहे. दोन अडीच महिन्यापूर्वी संवाद साधला होता. चिमुकल्यांनी चौथीच्या पाठातील कोलाज पाठातील सचिन तेंडूलकर त्यांनाच वाचून दाखविला होता. अनेक सेलिब्रेटी येथून सफारी करता, परंतु शाळेला भेट देण्याची सचिनसारख्या सेलिब्रेटीची पहिलीच वेळ असल्याने विद्यार्थी चांगलेच भारावले होते. यावेळी सचिन यांनी “मी पुन्हा भेट वस्तू घेऊन येईन” असा शब्द मुलांना दिला होता. दोन महिन्यापूर्वी दिलेला शब्द  शुक्रवारी (दि.५) अलिझंझा शाळेला पत्नी अंजलीसह भेट देऊन पूर्ण केला.

शुक्रवारी (दि.५) सकाळी सफारी आटोपल्यानंतर सायंकाळी पुन्हा अलिझंझा गेटमधून सफारी त्यांचे नियेाजन होते. तत्पूर्वी अलिझंझा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना भेट नियोजीत होती. गावात सचिन तेंडूलकर चिमुकल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी येणार असल्याने गावात एकच धावपळ सुरू झाली. शाळेला सुट्या लागल्याने शाळांना सुट्ट्या पडल्या होत्या; पण मुख्याध्यापक रमेश बदके व शिक्षिका मनिषा बावणकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट अलिझंझा शाळा गाठली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सांगितले. ८ मुले व ८ मुली असे १६ विद्यार्थी गणवेशात सचिनच्या स्वागतासाठी पटकन शाळेत पोहचली. यावेळी सरपंच गजानन वाकडे, शाळा समितीचे अध्यक्ष चौके, शिक्षक रविंद्र उरकुडे,अशोक कामडी व नागरिकही उपस्थित झाले. शाळेच्या प्रवेशद्वारात सचिनचे स्वागत केले.

Sachin Tendulkar : खूप शिका, मोठे अधिकारी बना

सचिन तेंडूलकर यांना प्रत्यक्षात पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. येथे फक्त पहिली ते चाैथीपर्यंत शाळा आहे. मागील वेळी त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना खूप शिका, मोठे अधिकारी बना असा सल्ला देऊन मी तुमच्याकरीता भेटवस्तू घेऊन पुन्हा, असा शब्द दिला होता. त्या शब्दाची आठवण सचिनने यावेळी मुलांना करून दिली.

हेही वाचा 

Back to top button