

पुणे : पुण्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी फिल्मी दुनियेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. चित्रपट आणि दूरदर्शन संस्था अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती अंतर्गत कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, (FTII Recruitment) ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट पदांच्या रिक्त जागा भरणार असून, चित्रपट आणि दूरदर्शन संस्था अंतर्गत होणाऱ्या या पदभरतीमध्ये एकूण 84 रिक्त जागेसाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज शुल्क हा Rs 1,000/‐ इतका आकारला जाणार आहे.
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 25 ते 50 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था अंतर्गत भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्यासाठी आणि या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा – http://ftii.ac.in.