लग्न समारंभाला गेल्‍याचे पाहून हुडकेश्वर परिसरात १८ लाखाची चोरी | पुढारी

लग्न समारंभाला गेल्‍याचे पाहून हुडकेश्वर परिसरात १८ लाखाची चोरी

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर येथील हुडकेश्वर परिसरात घरासमोरील शेजाऱ्यांकडे लग्न समारंभ पार पडले. या लग्न सोहळ्याचे दुसरे दिवशी आयोजित स्वागत समारंभात जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी तासाभराच्या अवधीत सुमारे 17 ते 18 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हुडकेश्वर परिसरातील सूर्योदय नगर परिसरात घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी संपूर्ण लॉकर रिकामे केले. नरेंद्र कोहाड यांच्या घरी ही चोरीची घटना घडली आहे. कोहाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोहाड कुटुंबीय या स्वागत समारंभासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले.

तासाभरातच साधारणतः दहाच्या सुमारास घरी परत आले, असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी घर बंद असल्याचा संधीचा फायदा घेत लॉकरमधील सुमारे 45 हजार रुपये रोख रक्कम 370 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे 17 ते 18 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गेले काही दिवसात शहरात हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वाधिक चोरीच्या घटना घडत आहेत. एका मंदिराला देखील चोरट्याने लक्ष्य केले होते. सध्या लग्नसराईच्या दिवसात घराला कुलूप असल्‍याचे पाहून या संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी दिल्‍या आहेत. परंतु यावर पोलीसांनी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी स्‍थानिकांनी केली आहे.

.हेही वाचा 

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर-मुंबई वनवास यात्रा

तळेगाव: शहरात वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम

Krithi Shetty: चित्रपट फ्लॉप पण सौंदर्याच्या बाबतीत अनेकांना देतेय टक्कर

Back to top button