मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर-मुंबई वनवास यात्रा | पुढारी

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर-मुंबई वनवास यात्रा

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई वाशी मराठा वनवास यात्रा 6 मे पासून महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन निघत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रस्थापित सर्व मराठा संघटना सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवशी ही यात्रा मुंबई येथे पोहचेल, अशी माहिती मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, तुळजापूर ते मुंबई अशी 475 किलोमीटरची यात्रा तुळजापूर, सोलापूर, मोहोळ, इंदापूर, उरुळी कांचन, पुणे आणि मुंबई पर्यंत पोहोचणार आहे. साडेचार कोटी मराठ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून या यात्रेमध्ये रुग्णवाहिका आणि उन्हापासून संरक्षण होण्याच्या अनुषंगाने सर्व खबरदारी घेतली आहे. पहाटे पाच वाजेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत ही यात्रा पायी चालणार आहे.

उन्हाच्या काळात विश्रांतीचा वेळ असणार आहे. संविधानाचा अभ्यास करून आपण 50% ओबीसी आरक्षणांमधून मराठा समाजाला आरक्षण मागतो आहोत. हे न्याय हक्काचे आरक्षणासून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचा आशीर्वाद तसेच तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन सर्वजण कामाला लागलो आहेत. या सर्व मार्गावर 95 ठिकाणी महत्त्वाचे टप्पे असून तीस मोठ्या सभा होणार आहेत.

50 टक्के ओबीसी आरक्षण मागणी करीत असताना 1994 मध्ये ओबीसी आरक्षण वाढवले गेले ही चूक आहे असा मुद्दा उपस्थित करून सकल मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण मिळू शकते हा संविधानाचा अभ्यास आहे असे सांगण्यात आले.

-हेही वाचा 

Sharad Pawar Withdraw Resignation : ‘लोक माझे सांगाती हेच माझे गमक’- पवारांचे मनोगत जसेच्या तसे

Sharad Pawar News : काकांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर! दिल्लीला गेल्याची चर्चा

उद्धव ठाकरे शनिवारी बारसू दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी

Back to top button