तळेगाव: शहरात वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम | पुढारी

तळेगाव: शहरात वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम

तळेगाव (पुणे): तळेगाव दाभाडे स्टेशन भागात वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. सलग आठवडाभर छत्रपती शिवाजी महाराज चौक,स्टेशन चौक, तळेगाव- चाकण महामार्ग आदी ठिकाणी चार चाकी गाड्यांवर ब्लॅक फिल्मची कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईत आतापर्यंत सुमारे ८६ चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सदर गाड्यांचे ब्लॅक फिल्म काढून टाकण्यात आले आहेत.

वाहनांवर थकीत असलेला दंड देखील वसूल केला जात आहे. जे वाहनांवरील दंड भरत नाही, दंड भरण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर यापुढे खटले दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल गजरमल, पोलीस उपनिरीक्षक रमेश पोटे आणि स्टाफ यांनी सलग कारवाई केल्यामुळे शहरात ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर दिसणे बंद झाले आहे. तसेच वाहतूक पोलिसांचा रोडवरील वावर वाढल्याने ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही, अल्पवयीन वाहन चालक, दुचाकीवर ट्रिपल शीट जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा बेशिस्त वाहन चालकांना आळा बसला आहे.

Back to top button