

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारीचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ ताडोबाचे नावाने व्हायरल केल्या जातात. त्याची सत्यता समोर येते तेव्हा तो व्हिडिओ अन्य ठिकाणचा आढळून येतो. मात्र अशा पर्यटनाच्या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांना पर्यटनाचा आनंद घेता येतो. अशाच एक पर्यटन सफारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये सफारीकरीता गेलेल्या पर्यटकांच्या जिप्सीवर आक्रमक होऊन डरकाळी फोडत वाघाने धाव घेतली. या प्रसंगाने पर्यटक चांगलेच घाबरले. थरारक व्हिडिओ ताडोबातील असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना ताडोबा अभयारण्याचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी हा व्हिडिओ ताडोबातील नव्हे, तर अन्य जंगलातील असल्याचे म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात उन्हाळा सुरू होताच पर्यटक जंगल सफारीसाठी मोठ्या संख्येने येतात. वाघ, बिबट, हत्ती, अस्वल, हरीण, चितळ, सांबर, कोल्हा, नीलगाय आदीं वन्य प्राण्यांचे दर्शन घेतात. वन्यप्राण्यांच्या सहवाता ताडोबाची भ्रमंती करतात. यामध्ये नवनवीन प्रसंगाचे फोटो व्हिडीओ व्हायरल होतात. जंगलात सफारी करणाऱ्या पर्यटकांसोबत घडलेल्या वाघाच्या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जिप्सीवर काही पर्यटक जंगलात सफारीसाठी गेले. जिप्सीतून जंगल सफारी सुरू असताना अचानक पट्टेदार वाघ डरकाळी फोडत रस्त्यावर येऊन जिप्सीवर धावून आला. आक्रमक वाघाच्या या थराराने पर्यटकांची चांगलीच ताराबंळ उडाली, ते या थरारक प्रसंगाने घाबरले. वाघाला बघून घाबरलेले पर्यटक पुढे गेल्यानतर परत जिप्सी मागे घेवून वाघाचा रूबाब बघण्यास उतावळे होत असल्याचे दिसून येत आहेत. चालक कसाबसा जिस्पी मागे घेतो तरीही वाघाची डरकाळी सुरूच असते. या व्हिडीओ मधील प्रसंगी बघून जिप्सीतील पर्यटकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
मात्र काही वेळातच वाघ जंगलात आत निघून जातो. वाघ गेल्याचे बघून पर्यटक पुन्हा त्याच मार्गाने शांततेत निघून जातात. वाघाच्या आक्रमक डरकाळीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वत्रिक झाला आहे. हा व्हिडिओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील असल्याची चर्चा समाज माध्यमावर सुरू आहे. हा व्हिडिओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनाही पाहता आला. परंतु हा व्हिडिओ ताडोबातील सफारीचा नाही, अन्य जंगलातील असावा, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे. यापूर्वीदेखील ताडोबाच्या नावावर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु जेव्हा की ते ताडोबा प्रकल्पातील नव्हते. तेव्हा समाज माध्यमावर अशा प्रकारे व्हिडिओ टाकताना संबंधितांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा