चंद्रपूर : वाघाचे हल्यात शेतकरी महिला ठार

File Photo
File Photo

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे शेतात काम करत असताना अचानक वाघाने हल्ला करून महिलेस ठार केले. ममता हरिचंद्र बोदलकर (७०) रा. वाघोली बुटी असे मृत महिलेचे नाव आहे.

वन विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथील महिला ममता बोदलकर ह्या स्वतःचे शेतात काम करण्यास सकाळी गेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना दूर फरफटत नेले. यामध्ये महिला शेतकरी ममता बोदलकरचा मृत्यू झाला.

नागरिकांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळालेनंतर वन विभागाचे अधिकारी , कर्मवारी घटनस्थळी पोहचले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुसऱ्या एका घटनेत मेहा बूजरुक येथे आज पहाटेच्या सुमारास कवडू निकुरे यांच्या गोठ्यातून बिबट्याने वासरू ठार केला. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट पळून गेला. तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news