चंद्रपूर: ब्रम्हपुरी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांचा राजीनामा | पुढारी

चंद्रपूर: ब्रम्हपुरी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांचा राजीनामा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: ब्रम्हपुरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि. २८) मतदान होत असताना ब्रम्हपुरी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेससह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्या मनमानी कारभारामुळे राजीनामा दिल्याचे नानाजी तुपट यांनी पत्रात म्हटले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी चुरशीची ठरणार आहे. काँग्रेस मधील नाराज उमेदवारांनी विरोधी पक्ष भाजपचा हात धरल्यामुळे काँग्रेस गोटात उमेदवारीवरून कलह निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तिसऱ्या आघाडीनेही निवडणूक रिंगणात उडी मारली आहे. परंतु ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरशीची होणार आहे. काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपचा हात धरला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ब्रह्मपुरी तालुका किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्या मनमानी कारभारामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र तडकाफडकी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांना दिले आहे. याचा नेमका फटका कुणाला बसणार ? हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.

हेही वाचा 

Back to top button