Same-sex marriage : समलैंगिक विवाहासंबंधी सोमवारी घटनापीठासमक्ष सुनावणी नाही

Same-sex marriage : समलैंगिक विवाहासंबंधी सोमवारी घटनापीठासमक्ष सुनावणी नाही
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठ सोमवारी सुनावणी घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनापीठातील न्या. संजय किशन कौल आणि न्या. एस. रवींद्र भट या दिवशी उपलब्ध नसल्याने सुनावणी टळली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यापूर्वी सोमवारी, २४ एप्रिल रोजी सुप्रिम कोर्ट कामकाजाच्या एक तास अगोदर घटनापीठाची कार्यवाही सुरू करेल, असे संकेत दिले होते. (Same-sex marriage)

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. एस. के. कौल, न्या. एस. आर. भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमक्ष समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. घटनापीठ कामकाजाच्या दिवसात सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजतापर्यंत सुनावणी घेते. पंरतु, सोमवारी याचिकांवर सुनावणी होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news