[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_title" view="circles" /]
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या एका पक्षाची दुस-या पक्षावर टिका सुरूच आहे. दरम्यान मविआ म्हणून सर्व पक्ष एकत्र आहोत. सर्वजण उत्तमपणे पुढे जात आहोत. (Balasaheb Thorat) अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना सभेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आलेले आहेत. आता सेना आमदारांच्या अपत्रतेचा निकाल लागताच हे सरकार कोसळणार आहे. त्यानंतर मविआच राहणार आहे, असा दावा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नागपूरात केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, कोणी काही कामानिमित्त बाहेर गेले असेल तर त्याचा अशा पद्धतीने विषय होणे योग्य नाही. राष्ट्रवादीचीही काही वेगळी भूमिका नाही. मविआमध्ये काही वेगळे बिलकुल घडत नाही आमची वज्रमुठ कायम आहे. आम्ही भक्कम राहणार असून नेहमी यशस्वी होणार आहोत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते दिसले देखील आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पराभूत होईल असा दावा थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला.लोकसभा निवडणूक चांगल्या जागा आम्ही घेऊ आणि विधानसभा पूर्णपणे जिंकू असे ते म्हणाले.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="true" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="2" order="DESC" orderby="post_title" view="list" /]
-हेही वाचा