नागपूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. खरेतर आपण हिंदुस्थानातच राहतो. हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने सांगावा. भाजप ज्यांना मानते त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती, ते त्यांनी स्पष्ट करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव मांडला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सातत्याने करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपचा देशाला हिंदुराष्ट्र करण्याच्या अजेंड्यावर ते बोलत होते.