Karnataka Election 2023 | कर्नाटकात मोठा राजकीय उलटफेर, भाजपला रामराम करत लक्ष्मण सवदी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लक्ष्मण सवदी
लक्ष्मण सवदी

पुढारी ऑनलाईन : भाजपमधून बाहेर पडलेले कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबाबतची अधिकृत माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बंगळूर येथे दिली. अथणी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर लक्ष्मण सवदी यांनी १२ एप्रिल रोजी विधान परिषद सदस्यत्वाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. (Karnataka Election 2023)

लक्ष्मण सवदी यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करताना कोणतीही अट ठेवलेली नाही. त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटते. अशा नेत्यांना काँग्रेस पक्षात घेणे आपले कर्तव्य आहे. सत्ताधारी पक्षातील ९ – १० पेक्षा जास्त आमदार काँग्रेसमध्ये सामील होण्यास इच्छूक आहेत. पण आमच्याकडे त्यांना सामावून घेण्यासाठी जागा नाही, असे डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करताना भाजपने 'दे धक्का' धोरण अवलंबल्यानंतर आता भाजपला धक्के बसू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आमदारकीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने सुमारे २० नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत.
लिंगायत समाजाचे प्रभावी नेते आणि २०१८ पर्यंत अथणी विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राखलेल्या लक्ष्मण सवदी यांनी विधान परिषद आमदारकीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी जाहीर केला होता.

लक्ष्मण सवदी हे अथणीचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. पण २०१८ मधील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काँग्रेसमधील इतर नेत्यांसह कुमठळ्ळी नंतर भाजपमध्ये सामील झाले. यामुळे काँग्रेस-जेडीएस युती सरकार पडले आणि २०१९ मध्ये बी एस येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले होते.

आता अथणीतून सवदी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय असलेले कुमठळ्ळी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपमधून बाहेर पडत काँग्रेसचा हात धरला आहे. (Karnataka Election 2023)

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news