पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘शांतीवन’ येथील संशोधन केंद्राचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील विविध ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिंचोली गावातील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दि० 13 एप्रिल रोजी आभासी पद्धतीने लोकार्पण होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समारंभास उपास्थित राहणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सामाजिक सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्राच्यावतीने शांतीवन ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. 1008 वस्तुंच्या संग्रहासह या परिसरात वैशिष्टयपूर्ण वास्तुकलेतून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांकरिता निवासस्थाने आदी 8 इमारती उभारण्यात आल्या आहेत. यापैकी संशोधन केंद्राच्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

शांतीवन येथील वस्तू संग्रहालय 

बाबासाहेबांच्या वैयक्तिक वापराच्या 188 प्रकारातील 1008 वस्तुंचे रासायनिक प्रक्रिया करून जतन व संरक्षण करण्यात आले आहे. यात देशाचे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी वापरलेले टाईप रायटर, बॅरिस्टर कोट, बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा समारंभातील बौद्ध मूर्ती, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तुंचा समावेश आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शांतीवन वास्तुसह येथील विविध प्रकल्पांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांकरिता निवासस्थाने आदी इमारती उभारण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाकडूनही शांतीवन वास्तू परिसरातील प्रकल्पांकरिता प्राप्त झाला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news