Sharad Pawar Meet Nitin Gadkari | शरद पवार- नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेकांना धक्का, चर्चेला उधाण

Sharad Pawar Meet Nitin Gadkari | शरद पवार- नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेकांना धक्का, चर्चेला उधाण
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Sharad Pawar Meet Nitin Gadkari) यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एकीकडे राज्यात भाजप विरोधात राष्ट्रवादीचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना गडकरी-पवार यांच्या भेटीने अनेकांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे गडकरी यांच्याकडे पवार यांनी स्नेहभोजनही घेतले.

शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र असलेली विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्था लवकरच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात सुरू होत आहे. आज या जागेची शरद पवार यांनी पाहणी केली. या संदर्भातील चर्चेसाठीच ही गडकरी-पवार यांची भेट होती. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.

आज नागपुरात उत्तर-दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या सर्वात मोठा ९.८ किमी उड्डाणपूल भूमीपूजनासह विविध कार्यक्रमांसाठी, जाहीर सभांमधून गडकरी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीने पवार आणि गडकरी यांचे विकासासाठी असलेले मैत्रीपूर्ण संबंधही पुन्हा एकदा उघड झाले.

विमानतळावर ढोलताशांच्या गजरात पवार यांचे स्वागत

दरम्यान, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आज नागपूर, अमरावती दौऱ्यासाठी आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पवार यांच्या स्वागतासाठी ढोलताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पक्ष कार्यालयात पूर्वतयारी बैठक घेतल्यानंतर नागपुरातील कार्यकर्ता मेळावा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सर्वांची निराशा झाली. साहजिकच स्वागतासाठी सर्वांची धडपड दिसली. यावेळी अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, दिलीप पनकुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आशिष देशमुख यांची हजेरी मात्र, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. स्वतः देशमुख यांनी शरद पवार यांचा विकासासाठी हा दौरा आहे. यात राजकारण नको असे सांगितले. (Sharad Pawar Meet Nitin Gadkari)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news