यवतमाळ : तिवरंग- तळणी पुलासाठी पैनगंगा नदी पात्रात उपोषणाचा इशारा

यवतमाळ : तिवरंग- तळणी पुलासाठी पैनगंगा नदी पात्रात उपोषणाचा इशारा

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ, नांदेडसह हिगोंली जिल्ह्यातील ५० गावांना जोडणार्‍या मराठवाड्यातील तळणी आणि विदर्भातील तिवरंग या गावादरम्यानच्या पैनगंगा नदीवरील पुलाकरीता अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद करण्यात आली नाही. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. ३) पासून पैनगंगा नदी पात्रात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा पैनगंगा नदीवर पूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी पुलाबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. अंदाजपत्रक सुद्धा अमरावती विभागीय अधीक्षक अभियंत्याकडे सादर करण्यात आले. या पुलाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू होते सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी पुलाचे काम मंजूर होईल, असे आश्वासन दिले होते. हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी या पुलास निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण अर्थसंकल्पात कोणतीही तरदूत केली नसल्याने मराठवाड्यातील तळणी, कोळी निवघा, वाटेगाव उमरी, कवळी मार्लेगाव व बामणी फाटा तर तालुक्यातील तिवरंग, झाडगाव भांबरखेडा, धानोरा, पिंपळदरी वाणेगाव, पार्टी, धनज, मोहदरी हातला, मुळावा, सुकळी (नवीन) या गावांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परिसरातील लोक आक्रमक झाले असून याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास उपोषणाचा इशारा माजी आमदार विजय खडसे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, श्रीधर धोंगडे, शिवाजीराव कदम, गुलाबराव धोंगडे, सुभाष रेदासनी, सतीश जारंडे, नारायण तावडे, मिलिंद तावडे आदींनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

परिसरातील 50 गावांना बसला फटका

राज्याच्या अर्थसंकल्पात तिवरंग- तळणी पुला ऐवजी वसंत सहकारी साखर कारखान्याजवळून जाणारा दिवटपिंपरी-साप्ती या मार्गावर 55 कोटीचा पूल मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे याच नदीवर आणखीन दोन पूल मंजूर केले. मात्र तळणी- तिवरंग दरम्यानच्या फुलाला मंजुरी मिळाली नाही. यामुळे तीन जिल्ह्यातील ५० गावांना याचा फटका बसला आहे.

हेही  वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news