जिल्हा बँकेत ‘मार्च एंड’मुळे शेतकर्‍यांची गर्दी ; पीककर्ज भरण्याची घाई

जिल्हा बँकेत ‘मार्च एंड’मुळे शेतकर्‍यांची गर्दी ; पीककर्ज भरण्याची घाई
Published on
Updated on

लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा : लोणी भापकर (ता. बारामती) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीककर्जाचे पैसे भरण्यासाठी बुधवारी (दि. 29) शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती. मार्चअखेरपर्यंत पीक कर्ज न भरल्यास सहाऐवजी 12 टक्के दराने परतफेड करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी हातउसने करून पैसे भरण्याची लगबग करत आहेत. नियमित पीककर्ज फेडणार्‍या व गेल्या वर्षी तीन लाख रुपयांच्या आतील पीक कर्ज घेतलेल्यांना यंदाही सहा टक्के दराने व्याज भरावे लागत आहे. तसेच गेल्या वर्षीही शेतकर्‍यांकडून पीककर्जावर सहा टक्के दराने शासनाने व्याजासहित रक्कम भरून घेतली. त्यांना व्याजाचा परतावा मिळेल, असे सांगितले होते; परंतु 'मार्च एंड' आला तरीही रक्कम जमा झालेली नाही. ज्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांच्या खात्यावरही पन्नास हजार रुपयांची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. गेल्या वर्षी भरलेल्या व्याजाची व या वर्षीच्याही व्याजाची रक्कम परत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कोणतेही सरकार शेतकरी हिताचे नाही
शेतकर्‍यांना सर्व बाजूंनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. शेतमालाला बाजारभाव नाही, वीज पुरेशी व वेळेवर मिळत नाही, वेळेवर युरिया मिळत नाही. डिझेल, खते, तणनाशकांच्या वाढलेल्या किमती,कोरोनाचे संकट, हवामानबदलाचा फटका आदी समस्यांना सामोरे जाताना त्यांची दोलायमान अवस्था झाली आहे. कोणतेही सरकार आले तरी शेतकरी हिताचे निर्णय घेत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी दिल्या.

बुधवारी पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, माळवाडी, लोणी भापकर आदी गावांतील सात सोसायट्यांचा मिळून 5 कोटी 25 लाख रुपये एवढा पीक कर्जाचा या बँकेत भरणा झाला.
                        – व्ही. ए. हिंगणे, शाखाप्रमुख, जिल्हा बँक शाखा, लोणी भापकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news