शेतकऱ्यांच्या हत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी : आ. प्रतिभा धानोरकर | पुढारी

शेतकऱ्यांच्या हत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी : आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या मांगली परिसरामध्ये शेत शिवारात असलेल्या मंदिरात झोपी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चोरीच्या दृष्टीने आलेल्या या दरोडेखोरांनी शेतकऱ्यांची हत्या केली असून त्यांचा तपास तातडीने करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भद्रावती वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे.

भद्रावती तालुक्यातील मांगली परिसरामध्ये जगन्नाथ बाबा मंदिर आहे. शेतकरी बापूजी खारकर आणि त्याचे सहकारी मधुकर खोजे हे वयोवृद्ध असून दोघेही मंदिरात झोपले होते. मंदिरात दानपेटी चोरीसाठी आलेल्या दरोडेखोरांनी या दोघांची हत्या केली. या घटनेमुळे भद्रावती मतदारसंघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सभागृहाचे लक्ष वेधले. या दरोडेखोरांची तातडीने चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button