वाशिम: जैन समाजाला शांतता राखण्याचे पर्यटनमंत्र्यांचे आवाहन | पुढारी

वाशिम: जैन समाजाला शांतता राखण्याचे पर्यटनमंत्र्यांचे आवाहन

वाशिम; पुढारी वृत्तसेवा :  वाशिम येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान मागील ४२ वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशाने उघडले. त्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. येथे थोडा वादही झाला. मात्र, जिल्हा प्रशासनाने हा वाद मिटवला. दरम्यान, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा आज (दि.२१) वाशिमच्या शिरपुर जैन येथे आले असता दोन्ही जैन समुदायात समेट घडवून आणल्याबद्दल त्यांनी वाशिम जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

शिरपूर जैन येथे एकच समाजातील दोन समूहात वाद झाला होता. हा वाद स्थानिक पातळीवर काल मिटवण्यात आला आहे. पुन्हा असे वाद होऊ नये, म्हणून राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि दोन्ही विश्वस्तांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर गावातील नागरिकांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान शिरुपूर जैन येथील अंगणवाडीला भेट देत लहान मुलांना जेवण कसे मिळते, याकडेही लोंढा यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर ४२ वर्षानंतर अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर खुले झाले आहे. त्यामुळे गावाच्या विकासाठी निधीची कमी पडू देणार नाही, असेही पर्यटनमंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

               हेही वाचलंत का ? 

Back to top button