

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सात महिन्यानंतर कोरोनाचे शहरात 6 तर ग्रामीणमध्ये 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता एच ३ एन २ एन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आज उघड झाले आहे. या घटनेनंतर उपराजधानीत चिंता वाढली आहे.
मार्च महिन्यात ढगाळ वातावरण, पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे घरोघरी सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. अशातच देश पातळीवर आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनने उपराजधानीत पहिला पहिला बळी गेल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, 'डेथ ऑडिट' झाल्यानंतरच या मृत्यूची तशी नोंद होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 9 मार्च रोजी मृत्यू झालेल्या या 78 वर्षीय रुग्णाची टेस्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आली. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सुरुवातीला उपचार सुरू होते. रुग्णाला 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह एच ३ एन २' म्हणून पल्मोनरी डिसीज' (सीओपीडी) यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या, अशी माहिती मिळाली.
सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठांनी, लहान मुले, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, कोव्हीड प्रोटोकॉलसारखेच वारंवार हात स्वच्छ धुवा, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा अशी सूचना यापूर्वीच आरोग्य यंत्रणांनी दिल्या आहेत.
हेही वाचा :