मुका घ्या नाही तर मिठ्या मारा, आम्हाला लक्ष करू नका! संजय राऊतांचे सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र | पुढारी

मुका घ्या नाही तर मिठ्या मारा, आम्हाला लक्ष करू नका! संजय राऊतांचे सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गाजत असलेल्या ‘व्हिडिओ प्रकरणी’ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. “तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा, आम्हाला का लक्ष करीत आहात?” असा सवाल त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. आम्हच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? असा जाब विचारत तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याचाशी आम्हाला देणे घेणे नाही, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले. सार्वजनिक ठिकाणी मुका घेणारे सुर्वे हे पहिले गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? व्हिडिओ लाईव्ह करणारा सुर्वे यांच्या मुलाला का अटक करण्यात आली नाही? असा सवाल राऊत यांनी केला.

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फिंग व्हिडीओ प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष करताना राऊत म्हणाले, मुंबईत व्हिडीओचे प्रकरण सुरू आहे. ‘मुका घ्या मुका’ नावाचा सिनेमा सुरू आहे. आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा मुका घ्या मुका हा सिनेमा गाजला होता. पंरतु, आताच्या या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितले का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल, असे संजय राऊत म्हणाले.

मुका घ्या किंवा मिठ्या मारा

मुका घेणारे प्रकाश सुर्वे पहिले गुन्हेगार आहेत. दादा कोंडके यांनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. आता शिंदे सरकारचा सिनेमा सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्या लोकांना अटक केली जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत. शिवसैनिकांचे दरवाजे ठोठावत त्यांच्या बायका, पालकांना धमक्या दिल्या जात आहेत. ही काय मोगलाई सुरू आहे का? आमच्यावर बोट दाखवू नका. मग शाहिस्ते खानाची बोट तुटली हे लेक्षात घ्या, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button