अमरावती जिल्हा बँक निवडणूक: यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलचे वर्चस्व

अमरावती जिल्हा बँक निवडणूक:  यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलचे वर्चस्व

काँग्रेस आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरलेली अमरावती जिल्हा बँक निवडणूक अखेर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलने जिंकली. पालकमंत्री ठाकूर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात खालील सहकार पॅनलने १० जागा जिंकत परिवर्तन पॅनेलाला धूळ चारली.

अमरावती जिल्हा बँक निवडणूक: यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलचे वर्चस्व
अमरावती जिल्हा बँक निवडणूक: यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलचे वर्चस्व

राज्यमंत्री बच्चू कडू व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. सोमवारी (४ ऑक्टोंबर) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (५ ऑक्टोंबर) पार पडली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या सहकार पॅनल विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे, शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, भाजपचे आमदार प्रताप अडसड, माजी आमदार अरुण अडसड या जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले होते. मात्र परिवर्तन पॅनल कडून केवळ राज्यमंत्री बच्चू कडू यांना विजय मिळविता आला.

या निवडणुकीत सहकार पॅनलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, दयाराम काळे, श्रीकांत गावंडे, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, बलवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, बाळासाहेब अलोने आदी दहा संचालक निवडून आले. परिवर्तन पॅनल मधून राज्यमंत्री बच्चू कडू, अजय मेहकरे, चित्रा डहाणे, रविन्द्र गायगोले तर अपक्ष म्हणून आंनद काळे यांनी बाजी मारली.

पॅनेलनिहाय बलाबल

सहकार पॅनलचे : 10

परिवर्तन पॅनलचे : 04

अमरावती जिल्हा बँक निवडणूक विजयी उमेदवार
  • राज्यमंत्री बच्चू कडू
  • आनंद काळे (अपक्ष )
  • रणजित चित्रकार ( सहकार )
  • दयाराम काळे (सहकार )
  • श्रीकांत गावंडे ( सहकार )
  • चित्रा डहाने ( परिवर्तन )
  • सुधाकर भारसाकळे (सहकार )
  • सुनील वऱ्हाडे ( सहकार )
  • वीरेंद्र जगताप (सहकार )
  • अजय मेहकरे (परिवर्तन )
  • हरिभाऊ मोहोड (सहकार )
  • बबलू देशमुख (सहकार )
  • बळवंत वानखडे ( सहकार )
  • पुरुषोत्तम अलोने ( सहकार )

अमरावती जिल्हा बँक निवडणूक महिला गट:

  • सुरेखा ठाकरे (सहकार )
  • मोनिका वानखडे ( मार्डीकर )(सहकार )

वैयक्तिक भागीदार , दुग्ध ,शेळीमेंढी संस्था , कृषी पणन,खरेदी विक्री मतदार संघ

  • रवींद्र गायगोले (परिवर्तन )

नागरी सहकारी बँक पतसंस्था ,गृहनिर्माण ,मजूर संस्था मतदार संघ

  • प्रकाश काळबाडे ( सहकार) 261 विजयी
हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news