यवतमाळ : तरुणीवर अत्याचार करणाऱ्या प्रियकरासह चौघांना २० वर्षाचा कारावासाची शिक्षा | पुढारी

यवतमाळ : तरुणीवर अत्याचार करणाऱ्या प्रियकरासह चौघांना २० वर्षाचा कारावासाची शिक्षा

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या नराधम प्रियकरासह त्याच्या मित्राला पांढरकवडा न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

वणी तालुक्यातील एका गावातील – तरुणी वणीतील एका महाविद्यालयात अकरावीव्याच्या वर्गात शिक्षण घेत होती. यादरम्यान, वणी तालुक्यातील मुर्धोणी येथील प्रफुल्ल धुळे नामक तरुणाशी तिची ओळख झाली. पीडिता ऑटोरिक्षाने बाहेरगावावरून वणीत शिकण्यासाठी येत असे. यादरम्यान प्रफुल्लने तिच्याशी ओळख वाढवत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार सुरू केले. अनेक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिचे शोषण करण्यात आले. २७ मार्च २०१४ रोजी प्रफुल्ल धुळे पीडित युवतीला दुचाकीवर बसवून मारेगाव रोडवर असलेल्या टेकडीवरील मंदिराच्या मागील जंगल भागात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. याचवेळी प्रफुल्लचा मित्र संदीप कुरेकार हा त्याच्या अन्य दोन मित्रांना घेऊन त्याठिकाणी पोहोचला.

या तिघांनीही पीडितेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तुझी गावभर बदनामी करू, तुझे आम्ही फोटो घेतले आहेत, ते फेसबुकवर टाकू, अशी धमकीही दिली व तिचा प्रियकर प्रफुल्ल धुळे याच्यासमोर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान, पीडितेने याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

अधिक वाचा :

Back to top button