माजलगाव : अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी चार आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी | पुढारी

माजलगाव : अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी चार आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक शेजुळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना बीड स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या आरोपीना पुढील तपासासाठी माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.

दि. ०७ मार्च २०२३ रोजी फिर्यादी श्री. अशोक तुळसिराम शेजुळ (व्यापार रा. गजानन नगर माजलगाव) हे त्यांचे दुचाकीवरून घरी जात असतांना त्यांच्या पाठीमागुन दोन ते तीन मोटारसायकलवरुन पाच ते सहा अनोळखी इसमांनी चेहरा झाकून त्यांना लोखंडी पाईपने दोन्ही पाय व हातावर, गालावर फिर्यादीस मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यानंतर हल्लेखोर मोटार सायकलवरून पसार झाले.

सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक यांनी तात्काळ दोन पथके रवाना केली आहेत. स्था. गु. शा. पथक आरोपीचे शोध कार्य चालू असतांना पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा अविनाश बाळासाहेब गायकवाड, विजय शिवाजी पवार, संदिप बबन शेळके (रा. पुरुषोत्तमपुरी), सुभाष बबन करे (रा. पुरुषोत्तमपुरी), शरद भगवान कांबळे (रा. पुरुषोत्तमपुरी ता. माजलगाव) यांनी केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून माजलगाव येथील लोकसेवा हॉटेल परिसरातून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन सदर आरोपीतांना माजलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन माजलगाव शहर करीत आहेत.

हेही वाचा;

Back to top button