MahaBudget 2023 : चार कोटी महिला व मुलींची होणार आरोग्य तपासणी | पुढारी

MahaBudget 2023 : चार कोटी महिला व मुलींची होणार आरोग्य तपासणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते त्यासाठी सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषाण अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्‍प सादर करताना केली.  राज्यात सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत अशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन ३५०० रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० रुपये आहे या मासिक मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपये एवढी वाढ करण्यात येत असल्याचेही त्‍यांनी यावेळी जाहीर केले. (MahaBudget 2023)

MahaBudget 2023 : माता सुरक्षित तर घर सुरक्षित

अर्थसंकल्प मांडताना फडणवीस असेही म्हणाले की, केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल.  त्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येणार आहे.  बचत गटांच्या माध्यमातून ३७ लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल. महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील, अशी घोषणाही त्‍यांनी यावेळी केली.

हेही वाचा 

Back to top button