निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्यावा : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्यावा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. १ मार्च) रात्री नागपुरात माध्यमांशी बोलताना दिले. खा. संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे. मात्र, ते कारागृहात राहून आले असल्याने त्यांना माफी मागण्याची सवय नाही.

संजय राऊत जे बोलतात त्यांना उध्दव ठाकरे यांची मान्यता असते, ते सामना मधून जे लिहितात त्याला त्यांची मान्यता असते. संजय राऊत जे बोलले ते उध्दव ठाकरे यांना मान्य आहे का, यावर सगळे पक्ष बोलले ते का बोलत नाही.जर ठाकरे सहमत नसेल तर राऊत यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा.

बाकी वेळेस प्रेस घ्यायला ठाकरे तत्पर असतात आज का बोलत नाही असा सवाल केला. या बोलण्याला काही अर्थ नाही, निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली आहे.

हक्कभंग समिती जी कारवाई करायची ती करेल पण उध्दव ठाकरे यांनी निदान फेसबुक लाईव्ह करून तरी भूमिका स्पष्ट करावी. आदित्य ठाकरे यांनी समोर येऊन बोलावं. 12 कोटी जनतेच्या मतांचा हा अपमान झाला आहे.

विरोधीपक्ष जो हक्कभंग आणेल तो समिती ठरवेल घ्यायचा की नाही..

धैर्यशील माने सारखा चांगला नेता आमच्याकडे आला याचा भाजपला नक्कीच फायदा होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, एक्झिट पोल वर विश्वास ठेवू नका. कसबामध्ये भाजपच निवडून येईल. दोन्ही जागा आम्हीच जिंकणार आहोत असा दावा त्यांनी केला.

Back to top button