नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा ८ मार्चपासून ‘युवारंग’ महोत्सव | पुढारी

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा ८ मार्चपासून 'युवारंग' महोत्सव

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा (युवक महोत्सव) ‘युवारंग २०२३’ चे आयोजन ८ ते १० मार्च दरम्यान करण्यात आले आहे. विद्यापीठाचे गुरुनानक भवन व एलआयटी कॅम्पस परिसर अमरावती रोड नागपूर येथे हा महोत्सव होणार आहे. यानिमित्ताने येथे तरुणाई अवतरणार आहे. या महोत्सवात संगीत, नृत्य, नाटक, साहित्य व ललित कला विषयांमध्ये निरनिराळ्या स्पर्धा होणार आहेत.

अंबाझरी रोड पीजीटी वस्तीगृह कॅम्पस येथील गुरुनानक भवन येथे बुधवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता ‘युवारंग’चे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे. संगीत प्रकारात सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, समूहगीत स्पर्धा, शास्त्रीय ताल, ताण वाद्य स्पर्धा होणार आहे. एलआयटी येथे होणाऱ्या साहित्य स्पर्धा प्रकारात वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा होणार आहे. गुरुनानक भवन येथे ललित कला प्रकारात पेंटिंग, पोस्टर, क्ले मॉडलिंग, व्यंगचित्र, कोलाज, रांगोळी, मेहंदी आदी विविध स्पर्धा होणार आहे.

गुरुवारी (दि. ९) नाटक प्रकारात गुरुनानक भवन येथे स्किट (लघु नाटिका), माइम (मूक नाट्य), मिमिक्री, वेस्टर्न सोलो, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो आदी स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (दि. १०) गुरुनानक भवन येथे नृत्य स्पर्धा सकाळी १० वाजेपासून होणार आहे. नृत्य प्रकारात शास्त्रीय नृत्यामध्ये भरत नाट्य, कथ्थक, ओडिसी, कथकली, कुचीपुडी, मणिपुरी, सतरिया, मोहिनी अट्टम आदी प्रकारांचा समावेश आहे. सोबतच लावणी व लोक नृत्य देखील सादर केली जाणार आहेत. याच ठिकाणी सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button