नागपूर : मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप | पुढारी

नागपूर : मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पत्नीचे निधन झाल्यानंतर आपल्या दोन मुलींचा योग्य प्रकारे सांभाळ करण्याची जबाबदारी बापावर असते. मात्र, बापानेच जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना नागपूरात घडली होती. या प्रकरणी आरोपी बापास न्यायालयाने गुरूवारी (दि.२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद इमरान अन्सारी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय ऑटो चालक मोहम्मद इमरान अन्सारी याच्या पत्नीचे १७ मे २०१९ रोजी निधन झाले. यानंतरच्या काळात या वासनांध नराधम बापाने अनुक्रमे १३ व १४ वर्षीय मुलींवर सातत्याने अत्याचार केला. विशेष म्हणजे मोहम्मदने मध्यंतरीच्या काळात दुसरा निकाह केल्यावरही त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत मुलींशी त्याचे कुकर्म सुरूच राहिले. अखेरीस या मुलींनी आपल्या पित्याविरोधात तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. गुरुवारी न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ.पी .जायसवाल यांनी आरोपी मोहम्मद इमरान अन्सारी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचंलत का?

Back to top button