सुमित्रा महाजन
सुमित्रा महाजन

नागपूर : राजकारणातील महिलांसाठी अनसूया काळे यांचे कार्य प्रेरणादायी : सुमित्रा महाजन

Published on

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा माजी खासदार स्‍व. अनसूया काळे यांनी राजकारणात वावरताना व्‍यक्तिमत्‍व कसे असावे, अभ्‍यासपूर्ण कसे बोलावे, वंचित समाजासाठी विशेषत: महिलांसाठी कसे कार्य करावे याचा वस्‍तुपाठ घालून दिला. त्‍यांचे हे कार्य राजकारणातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्‍दात माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

ज्येष्ठ उद्योजक स्व. पुरुषोत्तम काळे यांनी त्‍यांच्‍या पत्नी स्व. अनसूया काळे यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या मराठी पुस्‍तकाचा दीपाली काळे यांनी इंग्रजीत 'अनसूया माय वाईफ – द फायर ब्रॅण्ड फ्रिडम फायटर' या शीर्षकांतर्गत अनुवाद केला आहे. बनयान सभागृह, चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात ऑल इंडिया वुमेन कॉन्‍फरन्‍सच्या माजी अध्यक्षा शीला काकडे अध्यक्षस्थानी तर विलास काळे, कुमार काळे, जयदेव काळे, प्रवीण काळे प्रामुख्‍याने उपस्‍थ‍ित होते.

स्व. अनसूयाबाई काळे नागपूर लोकसभा मतदारसंघातील आजवरच्या एकमेव महिला खासदार होत्‍या. त्‍यांच्‍या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक प्रवासात स्व. पुरुषोत्तम काळे यांनी जी साथ दिली ती कौतुकास्‍पद होती. त्‍यांचे चरित्र वाचताना अनसूयाबाई यांच्‍या खंबीर, दृढनिश्‍चयी स्‍वभावाचा परिचय होतो, असे गौरवोद्गार सुमित्रा महाजन यांनी काढले.

शीला काकडे यांनी ऑल इंडिया वुमेन कॉन्‍फरन्‍सच्या कार्याची माहिती देताना अनसूयाबाई काळे यांच्या महत्‍त्‍वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. अनसूयाबाई काळे या एआयडब्ल्यूसीच्या 20 व्या अध्यक्ष होत्या.

राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. महानगरपालिकेच्‍या दहा झोनमध्‍ये स्‍व. अनसूयाबाई काळे स्‍मृती महिला समुपदेशन चालू असल्‍याची माह‍िती कल्‍पना फुलबांधे यांनी दिली. कार्यक्रमाला लीलाताई चितळे, सतीश चतुर्वेदी, कुंदाताई विजयकर, प्रगती पाटील, विशाल मुत्तेमवार, निलिमा शुक्‍ला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news