बुलढाणा : वरवंट बकाल येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको; रस्त्यावर कापूस व कांदे टाकून सरकारचा निषेध | पुढारी

बुलढाणा : वरवंट बकाल येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको; रस्त्यावर कापूस व कांदे टाकून सरकारचा निषेध

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात आज (दि.२२) पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील भागात चांगला प्रतिसाद मिळाला. वरवंट बकाल येथे स्वाभिमानी युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत कापूस व कांदे रस्त्यावर टाकून अकोला-बु-हाणपूर मध्यप्रदेशकडे जाणारी वाहतूक रोखली.

यावेळी रस्त्याच्या दोन्हीबाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सरकारने कापूस, सोयाबीन व कांद्याच्या भाववाढीसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, बोंडअळीमुक्त कपाशीचे बियाणे उपलब्ध करा, पीक विम्याची व अतिवृष्टीबाधित क्षेत्राची नुकसान भरपाई त्वरीत द्या, कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करा, थकीत बीलापोटी वीज जोडण्या खंडित करू नका, नाफेडद्वारे शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरु करा, बुलढाणा येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-याची चौकशी करा, आदी मागण्या या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button