Gadchiroli : नक्षलवाद्यांच्या हल्‍ल्‍यात दोन पोलीस शहीद; तर एक जखमी | पुढारी

Gadchiroli : नक्षलवाद्यांच्या हल्‍ल्‍यात दोन पोलीस शहीद; तर एक जखमी

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत असलेल्या भागात नक्षलवादी आणि पोलीसांमध्ये गोळीबार झाला. यात  दोन पोलीस शहीद झाले तर एकजण जखमी आहेत. ही घटना  आज सकाळी (दि.२०) ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. जंगलात संशियातांचा शोध सुरु आहे. (Gadchiroli)
मिळालेल्या माहितीनुसार आज (साेमवार) सकाळी बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता गेले होते. चहाचे ठिकाण पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्यावर होते. तेथे आधीच दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी आहे. जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळली. नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला. पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा

Back to top button