

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार (दि.१७) रोजी ते नागपूर दौर्यावर येणार आहेत. उद्या (दि. १७) सायंकाळी 7.30 वाजता फुटाळा येथे म्युझिकल फाउंटन आणि लाईट शोचा विशेष ट्रायल शो आयोजित करण्यात आला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित या ट्रायल शोला गृहमंत्री अमित शहा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Amit Shah)
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. (Amit Shah)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या म्युझिकल फाउंटेन शोला जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत लाभलेले असून, महानायक अमिताभ बच्चन, प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार, अभिनेते नाना पाटेकर यांची सूत्रसंचालन आहे.
हेही वाचा;