West Indies Cricket : वेस्ट इंडीज संघाला ‘वनडे’साठी मिळाला नवा कर्णधार | पुढारी

West Indies Cricket : वेस्ट इंडीज संघाला 'वनडे'साठी मिळाला नवा कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने यष्टीरक्षक शे होप याच्याकडे ‘वनडे’चे कर्णधारपद सोपवले आहे.  रोमवन पॉवेल याच्‍याकडे टी-20 चे नेतृत्व असेल. तर कसोटी क्रिकेटमध्ये क्रेग ब्रैथवेट हा नेतृत्व करताना दिसेल.(West Indies Cricket) गेल्या वर्षी झालेल्‍या टी-20 विश्वचषक स्‍पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्‍या आठ संघात स्‍थान मिळवता आले नव्‍तहे. त्‍यामुळे स्‍पर्धेतून बाहेर पडण्‍याची नामुष्‍की ओढावली होती. यानंतर निकोलस पूरन याने कर्णधारपद सोडले होते.

माझ्‍यासाठी हा मोठा सन्‍मान (West Indies Cricket)

वनडे साठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आल्‍यानंतर शे होप म्हणाला, “हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. वेस्ट इंडिज संघाचे कर्णधार व्‍हावे, असे अनेकांचे लहानपणापासून स्वप्न असते.”

वेस्ट इंडिजची संघ वनडे विश्वचषकाच्या शर्यतीत ८ व्या स्थानावर आहे. यावेळी हा विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी विश्वचषकात क्वालिफायर सामने खेळावे लागणार आहेत. (West Indies Cricket) हे सामने झिम्बाव्वेमध्ये होणार आहेत. वेस्ट इंडिजचा संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असेल. या दौऱ्यामध्ये दोन कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने तर ३ सामन्यांची टी 20 मालिकाही खेळवण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button