Bharat Jodo Yatra update : भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये होणार समारोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज ( दि. ३० ) श्रीनगर येथे समारोप होणार आहे. श्रीनगरमधील लाल चौकानंतर कॉंग्रेसच्या कार्यालयावर राहुल गांधी तिरंगा फडकवणार आहेत. या समारोप समारंभाला कॉंग्रेसने २१ राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे. १४५ दिवसांनी आज यात्रेचा प्रवास संपणार आहे. तब्बल ४०८० किलोमीटरचा प्रवास करुन श्रीनगरमध्ये पोहचल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेत भाजपसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल केला होता . (Bharat Jodo Yatra update)
हे पक्ष सहभागी होणार
भारत जोडो यात्रेची आज दि. ३० जानेवारी रोजी सांगता होणार आहे. या कार्यक्रमात द्रविड मुनेत्र कळघम (DMK), राष्ट्रीय जनता दल (RJD), जनता दल (संयुक्त), शिवसेना, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) CPI(M), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI), विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK), केरळ कॉंग्रेस, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) हे समविचारी पक्ष श्रीनगरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं म्हटलं आहे की, ३० जानेवारीला श्रीनगर येथे होणाऱ्या भारत जोडो यात्रा कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इतर राजकीय पक्षांचे नेतेही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना ३० जानेवारीला श्रीनगर येथे होणाऱ्या यात्रा आणि समारंभाच्या समाप्तीपर्यंत पुरेशी सुरक्षा पुरवण्याचा सल्ला दिलात तर मी आभारी आहे.”
Bharat Jodo Yatra update : : १४५ दिवसांत ४०८० किमी
- Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये पोहोचण्यापूर्वी काँग्रेसला धक्का; प्रवक्त्याने दिला राजीनामा
- भारत जोडो यात्रा आणि राजकारण
- राहुल गांधींचा भाजप कार्यकर्त्यांना ‘फ्लाईंग किस’, कार्यालयाच्या टेरेसवरुन पाहत होते भारत जोडो यात्रा ( पाहा व्हिडीओ )
LIVE: Flag hoisting | Srinagar | Jammu and Kashmir | #BharatJodoYatra https://t.co/kIRlraDwnz
— Bharat Jodo (@bharatjodo) January 30, 2023